ब्लॅक पँथर पक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाष देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली/मार्गदर्शनाखाली


कल्याण :(संपादक प्रवीण जाधव ब्लॅक पँथर पक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाष देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली/मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजकीय वाटचालीमध्ये, दिनांक ०८/०२/२०२६ रोजी, नवनियुक्त ठाणे जिल्हा प्रभारी – नागेश मोरे साहेब यांचा, ठाणे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांतर्फे, शाॅल व पुष्प देऊन सत्कार, मुंबई प्रदेश अध्यक्ष – अजय म कांबळे यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
ठाणे जिल्हा प्रभारी – नागेश मोरे यांच्या परिचयानंतर, त्यांनी व अजय म कांबळे यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. मुंबई प्रदेश अध्यक्ष – अजय म कांबळे यांच्याहस्ते ठाणे जिल्हा प्रभारी – नागेश मोरे साहेब यांना त्यांच्या अधिकृत नियुक्ती पत्रासह, ब्लॅक पँथर(पक्ष)ठाणे जिल्ह्याची फाईल देऊन, जबाबदारी सोपवण्यात आली. या जिल्हास्तरीय मिटींगसाठी मुंबई प्रदेश अध्यक्ष – अजय म कांबळे, ठाणे जिल्हा प्रभारी – नागेश मोरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष – विशाल गायकवाड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष – सुयोग गांगुर्डे, ठाणे जिल्हा सल्लागार – राजकुमार भारतीय, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा – सौ. गीता शैलेश काळे व ठाणे जिल्हा महिला महासचिव सौ वर्षा विनोद सावंत उपस्थित होते.
ब्लॅक पँथर पक्षाची बांधणी, वायुगतीने होत असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ब्लॅक पँथर पक्षाचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे जबाबदारी पार पाडत असल्याने, ब्लॅक पँथर (पक्ष) – जनतेचा हक्काचा राजकीय पक्ष आहे असा विश्वास जनतेमध्ये दृढ होत चालला आहे, ब्लॅक पँथर पक्ष देखील भारताच्या राजकारणात प्रभावशाली राजकीय पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात लवकरच यशस्वी होईल, असा विश्वास मुंबई प्रदेश अध्यक्ष – अजय म कांबळे यांनी जिल्हास्तरीय मिटींगमध्ये व्यक्त केला.


8
कृपया वोट करा

आपला कल्याण च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!